⏲️ *28 नोव्हेंबर

● दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या *ओमिक्रॉन* या नव्या कोरोना विषाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे -  महाराष्ट्रात सुद्धा नवे कोरोना नियम जारी झालेत 

● आता प्रवाशांना 500 रुपये दंड आकारला जाईल  - तर सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्यास -  50 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 

● हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे - राज्यात  29 व 30 नोव्हेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी -  मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे 

● राज्यात कोरोनाचे नवे संकट असल्याने , 1 डिसेंबरला शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता - आरोग्यमंत्री राजेश टोपें यांची माहिती

● जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार -  गुणरत्न सदावर्ते यांचे विधान 

● टाटा कंपनीने आपल्या Nexon या कारच्या किंमतीत  - 11 हजार रुपयांनी वाढ केली आहे - हि टाटाची सर्वाधीक विकली जाणारी कार आहे 

● शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी -  काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात युरियाची टंचाई निर्माण झाली होती - 

● मात्र आता असे होणार नाही , कारण आता केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे

● केंद्र सरकार विविध वस्तुंवरील जीएसटी GST वाढवण्याच्या विचारात आहे - यासाठी जीएसटी परिषदेकडून एका नव्या समितीची -  स्थापना देखील करण्यात आली आहे.